भारताविरोधात कटकारस्थान रचणारा उद्योगपती जॉर्ज सोरोसशी संबंधित संस्था ईडीच्या रडारवर ! काय घडलं?

18 Mar 2025 18:03:00
 
George Soros is on the ED
 
नवी दिल्ली: ( George Soros is on the ED's radar ) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी अराजकतावादी जॉर्ज सोरोससमर्थित काही संस्थांवर छापे टाकले. ईडीएफ आणि ओपन सोर्स फाउंडेशनसह अनेक संस्थांची चौकशी करण्यासाठी बंगळुरूमधील एकूण आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. फेमा उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी हा छापा टाकण्यात आला, असे ईडी मुख्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
ईडीच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की सोरोस आणि त्यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशनला २०१६ मध्ये गृह मंत्रालयाने पूर्व-संदर्भ श्रेणीत ठेवले होते, ज्यामुळे त्यांना भारतातील स्वयंसेवी संस्थांना अनियमित देणग्या देण्यास मनाई होती. या बंदीपासून मुक्त होण्यासाठी ओएसएफने भारतात उपकंपन्या निर्माण केल्या आणि एफडीआय व सल्लागार शुल्काच्या स्वरूपात भारतात पैसे आणले. हे पैसे एनजीओच्या उपक्रमांना निधी देण्यासाठी वापरले गेले, जे फेमा कायद्याचे उल्लंघन आहे.
 
सोरोस, ईडीएफ आणि ओएसएफने आणलेल्या इतर एफडीआय निधीच्या अंतिम वापराचीही ईडी चौकशी करत आहे. ईडीच्या छाप्यांमध्ये मेसर्स अस्पाडा इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडवरही छापे टाकण्यात आले. ही कंपनी भारतातील एसईडीएफची गुंतवणूक सल्लागार/निधी व्यवस्थापक आहे आणि मॉरिशस संस्थेची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0