मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Violence in Nagpur) क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील हिंदू संघटनांनी नुकतीच राज्यभर निदर्शने केली. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनात कारसेवेचा इशारा हिंदू संघटनांनी दिला आहे. यादरम्यान नागपुरात विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाच्या पुतळ्याचे दहन केल्याचे निदर्शनास आले. मात्र नागपूरच्या महाल परिसरात रात्री साडेआठ वाजता हिंसाचार उसळला. इस्लामिक कट्टरपंथींनी दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड सुद्धा केल्याचे दिसून आले. नेमकं हे सगळं कशामुळे झालं? वाचा सविस्तर
हे वाचलंत का? : प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रताप स्मारकाच्या उभारणीसाठी शिवभक्तांची मागणी
हिंदू संघटनांनी औरंग्याच्या कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून राज्यभरात तीव्र आंदोलन केले. काही ठिकाणी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर तोडण्यात आली तर काही ठिकाणी औरंग्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यानंतर समाजकंटकांकडून पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे कट्टरपंथींनी नागपुरातील महाल परिसरात हैदोस घालण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी घरांवर दगडफेक केली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका वाहनाला आग लावली. पोलिसांवरही हल्ले झाले. पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावरही झालेल्या कुऱ्हाडीच्या हल्ल्याने ते जखमी झाल्याची माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. ५५ हून अधिक जणांना ताब्यात घेतल्याची सध्या माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांची २० पथकं तैनात करण्यात आली आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी तोंड झाकले होते. त्यांच्या हातात तलवारी, काठ्या, बाटल्या होत्या. अचानक सर्वांनी गोंधळ सुरू केला. घरांवर दगडफेक सुरू केली. दुकानांची तोडफोड केली. यानंतर त्यांनी वाहनांच्या काचा फोडून पेटवून देण्यास सुरुवात केली. नागपुरात हे सर्व सुरु असताना मुंबईतही पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. म्हणजेच मालवणी, भिंडीबाजार, कुर्ला, शिवाजी नगर-मानखुर्द, अँटोपहिल या मुस्लिमबहुल भागात स्थानिक पोलिसांना सतर्क करण्यात आले होते. पोलिसांनी विविध क्षेत्रातील सर्व धर्मातील प्रमुख लोकांशी संपर्क साधला असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
वास्तविक ‘छावा’ चित्रपटाने महाराष्ट्रातलेच नव्हे, तर देशभरातले वातावरण ढवळून काढले. सिनेमाच्या निकषांवर सिनेमा खरा उतरलाच, पण हिंदूंच्या तीव्र भावना बोथट करून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याच्या वृत्तीचा अफजलखानी कोथळाच यानिमित्ताने बाहेर पडला. औरंगजेबाचे खरे रूप इतिहासाच्या तथ्यात पुराव्यांसह नोंदवलेले आहे. मात्र, पुरोगामित्वाचे ताबूत नाचवायचे असतील, तर खोट्या इतिहासाचे बुरखे घालावेच लागतात. हा बुरखा जरा जरी वर उचलला, तरी त्याखाली आत्याच्या नावाखाली वावरणारे मिश्या असलेले करामती काकाच सापडतात. एखादा कावळा मेला की, त्याचे जातभाई त्याच्या मुडद्याभोवती गोळा होतात. त्यांच्यात अंत्यसंस्कार कसे करतात माहीत नाही, पण कावकाव करून कोलाहल मात्र करतातच. औरंगजेबाचे तसेच झाले आहे. खरा इतिहास जाचक असतो आणि तो पुन्हा पुन्हा सांगितला गेला, तर तो अस्सल हिंदू अस्मिता निर्माण करतो आणि दाढ्या कुरवाळून निर्माण केलेल्या मतपेट्यांना ठोकर मारतो. यातून दुकाने बंद होतात, ती ढोंग्यांची!
‘छावा’मुळे औरंगजेबाची कबर उखडण्याचा जो काही सिलसिला आता सुरू झाला आहे, तो काही थांबणार नाही. रामजन्मभूमीचा लढा हिंदूंनी ५०० वर्षे लढला आणि न्यायसंगत मार्गाने जिंकलासुद्धा. राजकीय वरदहस्तावर जगणार्या पोंगापंडितांना ही धर्माची लढाई वाटत नाही. खरेतर, हे ‘जिहाद’ला उत्तर देणारे धर्मयुद्धच आहे. छत्रपती शिवाजी महाराज या धर्मयुद्धाचे मूळ प्रेरणास्थान बनले. औरंगजेबाच्या कबरीला हात लागताच, काही मंडळींनी उर बडवायला सुरुवात केलीय. धर्मांध मुसलमान व हिंदुत्व विचार मानणारे यांच्यातला उभा संघर्ष हा इथेच आहे. छत्रपतींपासून ते सावरकरांपर्यंत, सावरकरांपासून ते डॉ. हेडगेवारांपर्यंत, या महापुरुषांनी याच धर्मांधतेशी लढा स्वीकारला. अंदमानच्या कारागृहात इस्लाम स्वीकारण्याचे लालूच देऊन कैद्यांना बरी वागणूक देणारा मिर्झा खान सावरकरांच्याच लक्षात आला होता.
२०१४ साली त्रिपुरात सत्तांतर झाल्यानंतर लेनिनचा पुतळा जेसीबी लावून पाडून टाकला होता. ज्यांचे आपल्याशी, आपल्या देशाशी, आपल्या धर्माशी काहीही देणं-घेणं नाही, अशांचे पुतळे, मजारी का जोजवायचे, हा प्रश्नच आहे. धर्मांध मुसलमानांचा मूळ मुद्दा असा की, देशापेक्षा इस्लाम त्यांना महत्त्वाचा वाटतो. छत्रपती शिवरायांचा जीव घेण्यासाठी आलेल्या अफजलखानाचा छत्रपतींनी कोथळा काढला, मावळ्यांनी त्याच्या सैन्याची दाणादाण उडवली. प्रतापगडावर जिथे त्याचा देह सौजन्य म्हणून पुरला गेला, धर्मांधांनी त्या थडग्याचा ‘पीर अफजलखान’ कधी केला, हे कुणालाच कळले नाही. जणू काही तो छत्रपतींना स्वराज्यासाठी आशीर्वादच द्यायला आला होता. अब्दुल हमीद ते अब्दुल कलाम अशा राष्ट्रभक्त मुसलमानांची एक मालिका या देशात आहे आणि त्यांची स्मारकेही आपल्या देशात आहेतच. मात्र, श्रद्धेपोटी त्यांच्या स्मृतिदिनाला फारशी गर्दी होत असल्याचे ऐकीवात नाही. हिंदूंवर आक्रमण करणार्यांचे मात्र ‘पीर’ केले जातात. कबर मग ती औरंगजेबाची असो किंवा याकूब मेननची, धर्मांध मुसलमानांपेक्षा बाटलेलेच त्यावर अधिक धाय मोकलून रडायला लागतात.