नागपुरात कट्टरपंथींचा हैदोस

18 Mar 2025 11:30:36
 
Nagpur violent clash
 
नागपूर: ( Nagpur violent clash ) औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी ‘विश्व हिंदू परिषद’ (विहिंप) आणि ‘बजरंग दला’च्या कार्यकर्त्यांनी सोमवार, दि. १७ मार्च रोजी सकाळी नागपूर येथील महालातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. त्यानंतर पिसाळलेल्या धर्मांध कट्टरपंथींनी चिटणीस पार्कजवळ दगडफेक केल्याने दोन गटांत मोठा राडा झाला. दगडफेक, जाळपोळ आणि घोषणाबाजी यामुळे वातावरण तापले.
 
त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. तणावग्रस्त परिस्थिती पाहता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले.“नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे शहर आहे, ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशा वेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा,” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0