मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (British Jihadi News Channel) ब्रिटनचे प्रसिद्ध असलेले 'इस्लाम चॅनल' जे स्वतःला इस्लामिक समुदायाचा आवाज म्हणवतात, ते चॅनल आता प्रचंड अडचणीत सापडले आहे. दररोज २० लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा दावा करणारी ही वाहिनी ब्रिटन सरकारच्या ऑफकॉम म्हणजेच ऑफिस ऑफ कम्युनिकेशन्स या सरकारी संस्थेच्या रडारवर आली आहे. इस्लाम चॅनलवर हिंसक इस्लामिक चळवळींचे कौतुक करणे, पाश्चात्य देशांविरुद्ध द्वेष भडकावणे आणि जिहादी कारणांसाठी सहानुभूती व समर्थन दाखवल्याचा आरोप आहे.
हे वाचलंत का? : जिओच्या ग्राहकांना खूशखबर, जिओ हॉटस्टारवर बघा मोफत आयपीएल
'द टेलिग्राफ'च्या वृत्तानुसार, चॅनलचा दावा आहे की दररोज २० लाख लोक चॅनल पाहतात आणि ब्रिटनमधील ६० टक्के मुस्लिम त्याचे फॉलोअर्स आहेत. मात्र चॅनलवर आता निःपक्षपातीपणाचे नियम मोडून अतिरेक्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या इस्रायलवर हमासच्या हल्ल्याचे इस्लाम चॅनेलने कौतुक केले आणि इस्रायलची तुलना नाझींशी केली असा अहवाल ऑफकॉमला मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती आहे. इस्लाम चॅनलने अतिरेक्यांना व्यासपीठ दिले, राजकीय कव्हरेजमध्ये निष्पक्षता ठेवली नाही आणि आवश्यक तथ्यांबद्दल दर्शकांची दिशाभूल केली असा आरोपही अहवालात करण्यात आला आहे.
जिहादी गटांना समर्थन देण्याचा आरोप
अहवालानुसार, ऑक्सफर्ड इंस्टिट्यूट फॉर ब्रिटिश इस्लामचे संचालक डॉ. ताज हरगई यांनी ही तक्रार ऑफकॉमला दिली आहे. डॉ. हरगई यांना ब्रिटिश इस्लाममध्ये उदारमतवादी विचारवंत मानले जाते. त्यांच्या अहवालात नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत इस्लाम चॅनलने प्रसारणाचे नियम सातत्याने मोडले, असल्याचे सांगितले आहे.