जुहू किनारी सागरी कासवाचा अंडी घालण्याचा पुन्हा प्रयत्न; तिसऱ्याही वेळी झाले नको तेच

17 Mar 2025 13:00:00
juhu beach sea turtle nesting


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
मुंबईच्या जुहू किनाऱ्यावर समुद्री कासवाच्या मादीने पुन्हा एकदा अंडी घालण्याचा प्रयत्न केला. रविवार दि. १६ मार्चच्या मध्यरात्री मादी कासव किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आली होती (juhu beach sea turtle). मात्र, मानवी वावरामुळे ती पुन्हा समुद्रात परतली (juhu beach sea turtle). या महिन्यात मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर अशा पद्धतीने मादी कासव अंडी घालण्याचा प्रयत्न करत असल्याची ही तिसरी घटना आहे (juhu beach sea turtle). मात्र, या तिन्ही घटनांमध्ये मानवी वावरामुळे मादी कासव अंडी घालू शकली नाही. याबाबत वन विभागाने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. (juhu beach sea turtle)
 
 
राज्याच्या किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमधील काही प्रमुख किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची घरटी आढळतात. रायगडमधील चार, रत्नागिरीतील २३ आणि सिंधुदुर्गमधील ३० किनाऱ्यांवर आॅलिव्ह रिडेल प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. मात्र, मुंबईत सागरी कासवाची घरटी आढळत नाहीत. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची घरटी १९८५ सालापर्यंत आढळत होती. तसेच २०१८ साली वर्सोवा किनाऱ्यावर समुद्री कासवाची पिल्लं आढळली होती. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी ४ मार्च रोजी जुहू किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेली मादी कासव आढळली. त्यानंतर एरंगळ किनाऱ्यावर देखील ५ मार्च रोजी अंडी घालण्यासाठी आली होती. मात्र, या दोन्ही घटनांमध्ये किनाऱ्यावरील माणसांनी या मादीला छायाचित्रित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मादी अंडी न देताच समुद्रात पुन्हा परतली.
 
 
 
१६ मार्च रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा मादी कासवाने जुहू किनाऱ्यावर अंडी घालण्याचा प्रयत्न केला. जुही कोळीवाड्यानजीक असणाऱ्या किनाऱ्यावर ही मादी अंडी घालण्यासाठी आली होती. यावेळी देखील किनाऱ्यावर असणाऱ्या माणसांनी कासवासोबत छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेली मादी अंडी न घालताच समुद्रात परतली. याविषयी कांदळवन कक्ष-उत्तर कोकण विभागाचे विभागीय वनअधिकारी दिपक खाडे यांनी सांगितले की, "पुढचे काही दिवस आम्ही वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने पुन्हा एकदा जुहू किनाऱ्यावर गस्त घालून कासव विणीसंदर्भात लक्ष ठेवू." अशा प्रकारे जर मुंबईच्या कुठल्याही किनाऱ्यावर सागरी कासवांची मादी अंडी घालण्यासाठी आलेली दिसल्यास वन विभागाला १९२५ या क्रमांकावर किंवा ७७१०००००३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 
 
 
मुंबईतील पूर्वीच्या नोंदी
'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'च्या (सीएमएफआरआय) १९८३ सालच्या प्रसिद्ध झालेल्या संशोधन पत्रिकेनुसार 'माॅसन' नामक संशोधकाने, १९२१ साली प्रकाशित केलेल्या संशोधन पत्रिकेनुसार साष्टी (साॅलसेट) बेटावर (आताच्या मुंबई शहराच्या उत्तरेस असलेला व्रांदे ते मीरा-भाईंदरचा भाग) सागरी कासवाची विण होत होती. त्यानंतर १९७६ सालच्या नोंंदीनुसार मुंबईतील बॅकबे आणि फोर्ट किनाऱ्यावर कासवाची घरटी आढळून आल्याची नोंद आहे. ठाण्याच्या उपवनसंरक्षकांनी मार्च, १९८३ साली केलेल्या सर्वेक्षणानुसार गिरगाव चौपाटी, राजभवन किनारा, शिवाजी पार्क, जूह, वर्सोवा, मढ, गोराई, मार्वे, डहाणू, पालघर, आगर, सातपाटी या किनाऱ्यांवरुन कासवांच्या घरट्यांची नोंद करण्यात आली होती.
Powered By Sangraha 9.0