दिवंगत भाजप नेते अरविंद पेंडसे विचार मंचाची स्थापना

17 Mar 2025 19:21:24


Vichar Manch, Late BJP leader Arvind Pendse
 
ठाणे: ( establishes Vichar Manch of Late BJP leader Arvind Pendse ) भाजपचे कष्टाळू नेते व माजी भाजप ठाणे जिल्हा संघटन मंत्री दिवंगत अरविंद पेंडसे यांच्या विचारांची आणि सामाजिक व राजकीय कार्याची आजच्या पिढीला ओळख करून देण्यासाठी व त्यांच्यासारखे कार्यकर्ते घडविण्यासाठी अरविंद पेंडसे विचार मंचाची स्थापना करण्यात आली आहे.
 
मंचचे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. भाजपचे ठाणे जिल्हा संघटन मंत्री दिवंगत अरविंद पेंडसे यांनी १९८० साली भाजपच्या स्थापनेपासून संघटना मजबूत करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. तत्कालीन ठाणे संयुक्त जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागात कार्यकर्त्यांची बांधणी करून पेंडसे यांनी पक्षाचे संघटन मजबूत केले. मेहनत आणि संघटन कौशल्यामुळे ग्रामीण भागात त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणले. त्यामुळेच आज ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून तीन आमदार आणि एक खासदार निवडून आले आहेत.
 
पेंडसे यांच्यासारख्या मेहनती, प्रशिक्षित आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची आज भारतीय जनता पक्षाला गरज आहे. यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा, उपाध्यक्ष एड सुभाष काळे, सरचिटणीस शरद पुरोहित, कार्यकारिणी सदस्य व माजी नगरसेवक मृणाल पेंडसे, दिनकर दत्तात्रय दामले, प्रभाकर कुलकर्णी, के.पी. मिश्रा, विजय जोशी, रवींद्र कऱ्हाडकर, पंकज जैन, श्रीमती पी मृणाल, पवनकुमार शर्मा, सुमन अत्री, डॉ. सविता इंदोरिया आदींचा समावेश करण्यात आला आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0