मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Tiger Raja Singh on Aurangzeb Kabar) राज्यात क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा तेलंगणाचे आमदार यांनी याप्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी कबरीच्या देखभालीवर झालेल्या खर्चाची सविस्तर माहिती मागितली आहे. त्याचबरोबर कबरीवर होणारा खर्च तत्काळ थांबवण्याची मागणी देखील केली आहे.
हे वाचलंत का? : औरंग्याची कबर हटवा अन्यथा 'कारसेवा!'
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना लिहिलेल्या पत्रात, टी राजा यांनी औरंगजेबाच्या थडग्याच्या देखभालीसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने खर्च केलेल्या निधीची तपशीलवार माहिती मागितल्याचे निदर्शनास येत आहे. पुढे त्यात असेही म्हटले आहे की, ज्याने आमची मंदिरे पाडली, हिंदू राजांची हत्या केली आणि आमच्या संस्कृतीच्या दडपशाहीला कारणीभूत आहे अशा व्यक्तीच्या थडग्यावर सरकारी पैसा खर्च करण्याचे औचित्य काय?