अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड हल्ला करणाऱ्याचा पंजाब पोलिसांकडून एनकाउंटर

    17-Mar-2025
Total Views |
 
Gurusidat Singh
 
चंदीगड (Gurusidat Singh) : पंजाबमधील अमृतसरमध्ये ठाकुरद्वारा मंदिरावर नुकत्याच झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातील मुख्य आरोपीला सोमवारी सकाळी पोलिसांशी झालेल्या एका चकमकीत ठार करण्यात आले. गुरुसिदत सिंग असे या संशयिताचे नाव असल्याची माहिती समोर आली. त्याला आता पंजाब पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत गोळी लागली आणि नंतर तो रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावला. त्याचा साथीदार विशालला पळून जाण्यात यश आले. ही घटना १५ मार्च रोजी खंडवालातील मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी घडली.
 
या प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपी राजासांसी परिसरात फिरत असल्याचे सांगितले जात होते. त्यांना ताब्यात घेण्यासाठी सीआयए आणि छेहरता पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले.
 
पोलिसांनी मोटारसायकसलवरून आलेल्या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा त्यांनी गाडी सोडून गोळीबार केला. यावेळी मुख्य कॉन्स्टेबल गुरप्रीत सिंग यांच्या डाव्या हातात गोळी लागली असून दुसरी गोळी ही अमोलक सिंग या पोलीस अधिकाऱ्याला लागली. तिसरी गोळी ही संबंधित पोलिसांच्या गाडीला लागल्याचे दिसून आले. स्वसंरक्षणार्थसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी गोळीबार केला असून ज्यात गुरसिदक जखमी झाल्याची माहिती समोर आली.
 
जखमी असलेले पोलीस अधिकारी आणि आरोपी दोघांनाही सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यानंतर गुरसिदकचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याचा साथीदार हा फरार असून आणि पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
 
दरम्यान, अमृतसरच्या खंडवाल परिसरातील ठाकूरद्वारा मंदिरावर हल्लेखोरांनी ग्रेनेड हल्ला केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्ती मंदिराबाहेर थांबून त्यांच्यापैकी एकाने स्फोटक यंत्र फेकले. रात्री १२. ३५ च्या सुमारास झालेल्या या शक्तीशाली स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान कोणतीही एक जीवितहानी झाली नाही.
 
या प्रकरणात पोलीस आयुक्त गुरप्रीत भुल्लर म्हणाले की, प्राथमिक तपासात पाकिस्तानशी संबंध असल्याचे दिसून येते. पाकिस्तान वेळोवेळी अशा प्रकारच्या दुष्कृत्यांमध्ये सहभागी असतो. असे ते म्हणाले.