"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर
17-Mar-2025
Total Views |
भोपाळ : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
नुकताच धुलीवंदन हा सण देशातच नाहीतर जगभरात साजरा करण्यात आला. अनेकजण रंगात रंगून निघाले होते. या दिवशी अनेक वादंगाला तोंड फोडणाऱ्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशावेळी मोहम्मज शमीची मुलगी आयराने धुलीवंदन सण साजरा केला त्यावरून मोहम्मद शमीला सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केले.
कट्टरपंथी और चरमपंथी अपनी सीमाएं लांघ रहे हैं! इस देश में अब धमकी और नफरत की राजनीति नहीं चलेगी।
क्रिकेटर मोहम्मद शमी की बेटी के होली खेलने पर मोहम्मद शहाबुद्दीन रजवी का बयान न केवल आपत्तिजनक बल्कि अस्वीकार्य है। मैंने शमी को पत्र लिखकर कहा है कि उन्हें और उनकी बेटी को… pic.twitter.com/eDiuBTUSTd
मोहम्मद शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा करणे हे शरीयतेच्या विरूद्ध असल्याचे वक्तव्य मौलानाने केले आहे. यावर आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी या धर्मांध आणि कट्टरवाद्यांना सणसणीत सुनावले आहे. तसेच त्यांनी या प्रकरणावर मोहम्मद शमीला पत्रही लिहिले आहे. धमकी देणाऱ्या धर्मांधांना घाबरण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले आहेत.
याप्रकरणाला घेऊन मोहम्मद शमीला पत्रात लिहिले की, अशी अरेरावी धमकीची भाषा खपवून घेतली जाणार नाही. कट्टरपंथींकडून शमीच्या मुलीला धमकावण्यात आले. तसेच काँग्रेसने यावर भ्र शब्दही काढला नाही. सर्वच मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांना केवळ तुष्टीकरण करायचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले.