मुंबई : विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे. दौंड तालुक्यातील उमेश महादेव म्हात्रे असे या अर्जदाराचे नाव असून त्यांनी विधानपरिषेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
निवडणूकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यातील ३ जागा भाजपला तर प्रत्येकी एक जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. या तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवारही जाहीर केलेत.
हे वाचलंत का? - ...तर पाकिस्तान आणि बांग्लादेशात 'ती' घाण घेऊन जावी! मंत्री नितेश राणेंचा घणाघात
अशावेळी ही निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा सुरु असतानाच आता एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. उमेश महादेव म्हात्रे यांनी हा अपक्ष अर्ज दाखल केला आहे. "विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी मी अर्ज भरला आहे. या प्रक्रियेत सामान्य माणसांनी येणे गरजेचे असून गोरगरीबांचे प्रश्न मांडण्यासाठी मी ही पोटनिवडणूक लढवत आहे. त्यासाठी आमदार महोदयांनी मला चांगल्या पद्धतीने मतदान करावे," असे आवाहन त्यांनी केले आहे.