राष्ट्रवादी काँग्रेसकडून विदर्भातील 'या' बड्या नेत्याला विधानपरिषदेसाठी संधी! एकाच घरात दोन आमदार?

17 Mar 2025 12:04:11
 
NCP
 
मुंबई : विधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा आली असून त्यासाठी त्यांनी नुकाच आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांना विधानपरिषदेसाठी संधी दिली आहे. सोमवार, १७ मार्च रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २७ मार्च रोजी मतदान पार पडेल.
 
विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. या निवडणूकीकरिता भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली आहे.
 
हे वाचलंत का? -  विधानपरिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर! कुणाला मिळाली संधी?
 
एकाच घरात दोन आमदार? 
 
संजय खोडके हे विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. तसेच ते अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय खोडके हे राष्ट्रवादीच्या अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत. त्यामुळे आता एकाच घरात दोन आमदार पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संजय खोडके आपला उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0