बांगलादेश विश्व हिंदू परिषदेचे महासचिव कपिल कृष्ण मंडल यांना अटक

17 Mar 2025 16:28:29
 
Kapil Krishna Mandal arrested
 
ढाका (Kapil Krishna Mandal arrested) : बांगलादेशात हिंदूंवर अन्याय अत्याचार सुरूच आहेत. बांगलादेशात विश्व हिंदू परिषदेचे महासचिव कपिल कृष्ण मंडल यांना पोलिसांनी शनिवारी १५ मार्च २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास अटक केली. त्यांच्यावर राजद्रोह आणि देशद्रोहाविरोधात गंभीर आरोप लावण्यात आला आहे.
 
संबंधित प्रकरणाच्या अहवालानुसार, बगोरहाट जिल्ह्यातील उपजिल्हा चितलमारी येथे त्यांना अटक करण्यात आली. कपिल कृष्णमंडल बांगलादेशी अश्विनी सेवाश्रमचे अध्यक्षही आहेत. पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरावर छापा मारला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांच्या मोबाईमध्ये काही दलालांसोबत बैठकीला बसल्याचे पुरावे सापडल्याचा दावा करण्यात आला. ज्यात देश-विदेशातील दलालांचा समावेश असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
 
 
 
चितलमारी पोलीस ठाण्याचे ओसी शाहदत हुसैन यांनी सांगितले की, गुप्तचर माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कपिल त्याच्या ५-६ साथीदारांसह बांगलादेशची सुरक्षा कमकुवत करण्याचा कट रचण्यात आला. २००९ च्या दहशतवादी विरोधा कायद्यांतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी १५ मार्च २०२५ रोजी कपिल कृष्ण दास यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कोठडीत दाखल करण्यात आले. दरम्यान. मध्यंतरी इस्कॉनचे माजी पुजारी चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0