ठाणे: ( Export Promotion Seminar for Small Industries in Thane ) केंद्रीय लघु उद्योग मंत्रालय यांच्यावतीने टिसा व कोसिआच्या सहकार्याने लघु उद्योगांसाठी निर्यात प्रमोशन या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील टिसा हाऊस येथे १८ मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या कालावधीत हा परिसंवाद होणार असून यामध्ये ई कॉमर्ससह शासनाच्या लघुउदयोगांसाठी असलेल्या विविध योजनांबाबत माहिती दिली जाणार आहे.
अशी माहिती टिसाचे कार्यकारी सचिव एकनाथ सोनवणे यांनी दिली. या परिसंवादामध्ये मर्यादीत जागा असुन प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल. इच्छुकांनी सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी करावी.