इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनीचे सपा नेत्याकडून लैंगिक शोषण

17 Mar 2025 18:55:26
 
sexually abused
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बालिया जिल्ह्यातील भीमपूरा पोलीस ठाणे क्षेत्रात इयत्ता दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप सपा नेत्यावर आहे. सपा नेत्याचे नाव हे जनार्दन यादव असून ही घटना रविवारी रात्री घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात संबंधित आरोपी सपा नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पीडित युवती ही गाजीपुरातील करीमुद्दीनपुरमध्ये वास्तव्यास होती. बासमती सरजू उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेत होती. तिच्या दहावी बोर्ड परिक्षेचे केंद्र हे खरऊपुर होते.
 
गाजीपुरच्या करीमुद्दीनपुर ठाणे क्षेत्रातील एका गावातील निवासी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मुलीचा प्रवेश हा बासमती सरजू उच्च माध्यमिक खरऊपुर बलियात करण्यात आला. तिच्या इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेचे केंद्र एसवीबीसीआईसी खरऊपुर असल्याचे सांगण्यात आले.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२५ रोजी पीडितेचा गणिताचा पेपर होता. विद्यार्थिनीच्या काकांना सांगितले की, जनार्दनने प्रश्नपत्रिकेबाबत सांगण्याच्या बहाण्याने तिला शाळेच्या परिसरात एका खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. नंतर त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. परीक्षा संपवून घरी परतलेली विद्यार्थीनी भयभीत झाली होती. कुटुंबाने विचारले तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला होता.
 
या प्रकरणात, रविवारी १६ मार्च २०२५ रोजी पीडितेच्या काकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जनार्दन यादवला अटक केली. पोलीस ठाण्याचे प्रभारी मदन पटेल म्हणाले की, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
Powered By Sangraha 9.0