छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज लोकार्पण

17 Mar 2025 15:30:31
 
Chhatrapati Shivaji Maharaj statue to be unveiled today in dombivali
 
डोंबिवली : ( Chhatrapati Shivaji Maharaj statue to be unveiled today in dombivali ) ‘कडोंमपा’च्या डोंबिवली विभागातील घरडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सोमवार, दि. १७ मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
 
इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा भव्य पुतळा उभारण्यासाठी महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी तरतूद या अंतर्गत निधी मंजूर झाला असून, याबाबतचा प्रशासकीय ठराव सप्टेंबर २०२४ मध्ये मंजूर झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा १२ फुटी अश्वारूढ पुतळा घरडा सर्कलच्या मध्यवर्ती भागात बसविला जाणार असून, आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0