मुंबई : लाडकी बहिण योजना बंद करणार नसून त्यात काही दुरुस्ती करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली. सोमवार, १७ मार्च रोजी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
हे वाचलंत का? - बेकायदेशीररित्या दिलेले ४० हजार जन्म प्रमाणपत्र रद्द! राज्य सरकारचा मोठा निर्णय
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "आम्ही कुठल्याही महिला भगिनीचे पैसे परत घेणार नाही. ही योजना सुरु ठेवणार असून आवश्यक तो निधी देणार आहे. ही योजना गरीब घटकांतील महिलांकरिता आहे. कधी कधी योजना येते पण काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण त्यात दुरुस्ती करतो. या योजनेतही आम्ही दुरुस्ती करणार आहोत. ही योजना बंद करणार नसून कुठल्याही गरीब महिलांवर अन्याय करणार नाही. ज्याला गरज आहे त्याला १०० टक्के निधी देणार आहोत," अशी ग्वाही त्यांनी दिली.