लष्कर-ए- तोएबचा दहशतवादी अबू कतालचा खात्मा, झेलममध्ये अज्ञातांनी वाजवला गेम

16 Mar 2025 19:17:59
 
 Abu Qatal
 
नवी दिल्ली : लष्कर -ए तोएबाचा दहशतवादी अबू कताल (Abu Qatal) याला १६ मार्च २०२५ रोजी पाकिस्तानातील झेलममध्ये अज्ञात व्यक्तींना ठार मारले. अबू कटाल आपल्या सुरक्षा रक्षकासोबत जात होता, तेव्हा काही लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी १५-२० राऊंड गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात त्याच्यासोबत त्याचा सुरक्षा रक्षकही मारला गेला आणि तो स्वत:ही जागीच ठार झाल्याची घटना आहे. 
 
अबू कताल हा पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि मोस्ट वॉन्टेड होता. भारतात झालेल्या हल्ल्यांमध्ये तो सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो पूंछ-राजौरी भागात सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने १००० साली पहिल्यांदा जम्मूमध्ये घुसखोरी केली होती. हाफिज साईशी त्याचे नातेसंबंध हे काका-पुतण्याप्रमाणे होते. त्याला हाफिजला राईट हँड म्हणून ओळखले जात होते.
 
अबू कताल हा १ जानेवारी २०२३ रोजी राजौरी जिल्ह्यातील धागंरी गावात झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात अबू कटालचे नावही असल्याचे वृत्त आहे. ज्यात त्याने सात निष्पाप लोकांना मारले होते. या प्रकरणी आता एनआयएने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. ज्यात अबू कटालसोबत इतर दहशतवाद्यांच्या नावांचा समावेश आहे. शिवाय ९ जून २०२४ रोजी शिवखोडीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही अबू कटालचे नाव पुढे आले होते. त्या हल्ल्यात कटालने १० जणांना ठार केले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0