बलुचिस्तानात पाकिस्तानी सैनिकांवर प्राणघातक हल्ला

16 Mar 2025 17:25:49

Bus accident Balochistan
 
बलुचिस्तान (Bus Accident Balochistan) : पाकिस्तानातील बलुचिस्तानच्या नोशकीमध्ये रविवारी १६ मार्च २०२५ रोजी झालेल्या एका स्फोटात पाकिस्तानच्या फ्रंटियर कॉर्प्सच्या तीन सैनिकांसह पाच जण सैनिक मारले गेले आणि किमान ३० हून अधिक जखमी झाले आहेत. बीएलएच्या बंडखोरांना सुमारे ४४० प्रवाशांसह रेल्वे हायजॅक केल्यानंतर काही दिवसांनंतर ही घटना घडली आहे.
 
या प्रकरणी आता नोशकी शहरातील पोलीस अधिकारी मोहम्मज जफर यांनी सांगितले की, इराणी सीमेवरील तफ्तानकडे जाणाऱ्या एका ताफ्यात एकूण सात बस होत्या. नोशकीमध्ये स्फोटकांनी भरलेल्या कारने एका बसला धडक दिली, असे पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली. तसेच या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आणि ३५ जण जखमी झाले आहेत. पख्तूनख्वा प्रांतात सुरक्षा दलातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी पोलिसांना दिली होती. दरम्यान, या अपघातात मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.
 
 
 
दरम्यान, आता बलुचिस्तान लिबरेशन आर्मी बीएलएने हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि ९० सैनिकांना मारल्याचा दावा करण्यात आला. बीएलएने म्हटले की, त्यांच्या माजीद ब्रिगेडने आरसीडी महामार्गावर हल्ला केला. या हल्ल्यात एक बस उद्ध्वस्त करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या बसला घेराव घालण्यात आला आणि ज्यात इतर काही सैनिक ठार मारले गेले होते.
 
यापूर्वीही, बीएलएने १२ मार्च २०२५ रोजी जाफर एक्सप्रेसने अपहरण केल्याचा दावा करण्यात आला होता. ज्यात १५० हून अधिक लोक मारले गेले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0