चंदीगड : अमृतसरमधील ठाकुरद्वारा मंदिरावर दोन दुचाकीवर तरुणांनी ग्रेनेडने हल्ला केला आहे. हल्ले करणारे लोक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये रात्री १५.३५ च्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर हे दुचाकीवरून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. ही घटना अमृतसरच्या खंडवाला भागातील ठाकुरद्वार मंदिरातील ही घटना आहे. यामुळे आता संपूर्ण मंदिरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ज्यावेळी मंदिरावर हल्ला करण्यात आला तेव्हा मंदिराचे पुजारीही आत झोपले होते. पण सुदैवाने मंदिपाचे पुजारी या झालेल्या हल्ल्यापासून थोडक्यात बचावले गेले. सीसीटीव्हीच्या आधारी संबंधित प्रकरणाची शोधमोहिम सुरू आहे. फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, दोन तरूण हे मोटारसायकलवरून येत आहेत. त्यांच्या हातात एक ध्वजही आहे. ते काही सेकंद मंदिराबाहेर उभे राहतात आणि मंदिराच्या दिशेने ग्रेनेड फेकत असल्याचे सांगितले जात आहे.
त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला असून त्यानंतर लगेचच मंदिरात एक मोठा स्फोट झाला, ज्या मंदिरावर हल्ला करण्यात आला ते मंदिर हे अमृसरमधील खंडवाला येथील ठाकरद्वारा आहे. अशाच प्रकारची घटना अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावरही झाला होता. त्या हल्ल्यात ५ भाविकांवर हल्ला करण्यात आला. एका अज्ञाताने पाच जणांवर रॉडचा वापर करत हल्ला केला.