मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Attack on hindus during holi) होळीच्या दिवशी इस्लामिक कट्टरपंथीयांनी हिंदूंवर हल्ला केल्याची घटना पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात घडली आहे. बीरभूमच्या अनैपूर गावात शुक्रवारी (१४ मार्च) डोल पौर्णिमा आणि होळी साजरी करणाऱ्या हिंदूंवर पोलिसांसमक्ष हिंदूंवर हल्ला केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अमित मालवीय यांनी यासंदर्भात ट्विट करत हे प्रकरण उघडकीस आणले.
हे वाचलंत का? : तुषार गांधींनी संघाविरोधात ओकली गरळ
ममता बॅनर्जींच्या राजवटीत पश्चिम बंगाल हळूहळू बांगलादेशासारखे होत आहे. होळी साजरी करणाऱ्या हिंदूंवर झालेला हल्ला टीएमसीच्या पंचायत सदस्याने केल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केलाय. हिंदूंनी जय श्रीरामचा जयघोष केल्याप्रकरणी धर्मांधांनी हिंदूंना लक्ष्य केल्याचे व्हिडिओतून स्पष्टपणे दिसत आहे. हिंदूंना हिंसाचारापासून वाचवण्याऐवजी पोलिसांनी हल्लेखोरांना वाचवल्याचा आरोप अमित मालवीय यांनी केला.
या हिंसक संघर्षानंतर, बीरभूम जिल्हा प्रशासनाने सायंथिया शहराजवळील पाच ग्रामपंचायतींमध्ये सोमवार, दि १७ मार्चपर्यंत इंटरनेट सेवांवर बंदी घातली आहे. प्रशासनाने सांगितले की, अलीकडील घटना पाहता, इंटरनेट सेवा अफवा पसरवण्यासाठी आणि बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी वापरली जाऊ शकते. त्यामुळे या सेवा सैंथिया नगर, हातोरा, मठपलसा, हरिसरा, फरियापूर आणि फुलूर ग्रामपंचायतींमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत.