पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे थोरले पुत्र आमदार तेज प्रताप यादव (Tej Pratap) यांचा एक व्हिडिओ शनिवारी व्हायरल होत आहे. ज्यात ते पूर्णपणे धुलीवंदना दिवशी रंगात रंगून गेलेले दिसत आहेत. एका व्हिडिओत तेज प्रताप यांनी पोलिसाला नाचण्याचे आदेश दिले. संबंधित व्हिडिओत तेज प्रताप एका पोलीस कॉन्स्टेबलला आवाज देत आहे. अरे कॉन्स्टेबल मी गाणे वाजवतो, त्यावर तुला नाचावे लागेल. वाईट वाटून घेऊ नकोस, होळी आहे. जर नाचला नाहीस तर तुला मी निलंबित करेन, यावरून संबंधित पोलिसाने लाजेकाजे सर्वांसमोर नाच केला. ही घटना १४ मार्च २०२५ रोजी धुलीवंदना दिवशी घडली.
जेडीयूचा हल्लाबोल
या व्हिडिओवर जेडीयू नेते राजीव रंजन म्हणाले की, लालूजींच्या पथोरल्या राजकुमारांची कृती पाहा. तो एका पोलिसांना नाचकाम करण्यास सांगत आहे. जर नाचकाम केले नाहीतर निलंबित करण्याची धमकी देत आहे. लालू कुटुंबाला समजून घ्यावे लागेल की बिहार आता बदलला आहे. बदलत्या बिहारमध्ये अशा कृत्याला थारा नाही.
भाजपचा हल्लाबोल
अशातच आता बिहारमधील राजदचे नेते तेज प्रताप यादव यांच्या सुचनेनुसार पोलिस नाचकाम करत असल्याच्या व्हिडिओवर प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, जसा बाप तसा बेटा, यापूर्वीही वडिलांचे सरकार होते तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेची पायमल्ली करत. आता सत्ता नसूनही तोच प्रकार सुरू आहे. आता जर ते चुकूनही सत्तेत आले तर कायदा हातात घेतील. कायद्याचे उल्लंघन करतील आणि त्यांच्या तालावर नाचण्यास भाग पाडले जाईल. म्हणून त्यांना सत्तेपासून दूर ठेवणे महत्त्वाचे आहे.