रामनवमीवरून सुवेंदू अधिकारींची मोठी घोषणा; ममतांविरोधातही साधला निशाणा

14 Mar 2025 20:34:06

Suvendu Adhikari on Ramnavami

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Suvendu Adhikari on Ramnavami)
रामनवमीच्या मुहूर्तावर सुमारे दोन हजार रॅलीमध्ये एक कोटी हिंदू सहभागी होतील, अशी मोठी घोषणा पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी शुक्रवारी केली. इतकेच नव्हे तर ममता सरकारविरोधात निशाणा साधत रॅली काढणाऱ्यांनी प्रशासनाची परवानगी घेऊ नये, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

हे वाचलंत का? : युनूसना हुकूमशहा म्हणत बांगलादेशी राजदूतने दिला घरचा आहेर

ते म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये ६ एप्रिल रोजी रामनवमीच्या सुमारे २००० रॅलींमध्ये एक कोटींहून अधिक हिंदू सहभागी होतील. पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम मतदारसंघातील एका कार्यक्रमात बोलताना, अधिकारी यांनी रामनवमी आयोजकांना "आम्हाला प्रभू रामाची प्रार्थना करण्यासाठी परवानगीची गरज नाही" म्हणून रॅली काढण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेऊ नये असे आवाहन केले. रॅली दरम्यान प्रत्येकजण शांततेत राहील याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे अधिकारी म्हणाले.

गेल्या वर्षी, सुमारे ५० हजार हिंदूंनी सुमारे एक हजार रॅलींमध्ये सहभाग घेतला होता. यावर्षी, ६ एप्रिल रोजी १ कोटीहून कमी हिंदू दोन हजार रॅली काढण्यासाठी राज्यभर रस्त्यावर उतरतील, अशी माहिती आहे.

Powered By Sangraha 9.0