धक्कादायक! शिवसेना जिल्हाध्यक्षाची भर दिवसा गोळी घालून हत्या! एक अल्पवयीन मुलगाही जखमी - वाचा काय घडलं?

14 Mar 2025 19:26:37
 
Mangal Roy Firing
 
चंदीगड (Mangal Roy Firing)  : पंजाबमधील मोगामध्ये शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार करत हत्या करण्यात आली. . ही घटना गुरूवारी १३ मार्च २०२५ रोजी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. फोटोमध्ये संबंधित व्यक्तीवर हल्ला करण्यात आला त्याच्या खांद्यावर शिवसेना पक्षाचे उपरणे परिधान करण्यात आलेले आहे. या गोळीबारात एका अल्पवयीन मुलावरही गोळीबार करण्यात आला. त्यात तो जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
एका व्हिडिओनुसार, गुरूवारी रात्री शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मंगल राय दूध खरेदी करताना ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, रात्री १० वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. परंतु ती गोळी मंगाऐवजी १२ वर्षांच्या मुलाला लागली. त्यानंतर मांगा हा घटनास्थळावरून ताबडतोब एका दुचाकीवरून पळून गेला पण हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला.
 
 
 
पोलिसांनी सांगितले की, पाठलाग करताना हल्लेखोरांनी पुन्हा मंगा यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यावेळी मंगा यांना लागली, त्यानंतर हल्लेखोरा घटनास्थळावरून पळून गेले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी मंगा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले.
 
या प्रकरणाची पुष्टी आता पोलीस प्रशासन करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगिंदर शर्मा म्हणाले की, आम्हाला कळाले की, काही बदमाशांनी मंगा यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली आहे, संबंधित प्रकरणाची माहिती समोर येताच आम्ही रुग्णालयात दाखल झालो.
 
मंगाच्या मुलीने एका प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की, तिचे वडील हे गुरूवारी रात्री ८ वाजता दूध आणण्यासाठी घराबाहेर आले होते. त्यानंतर रात्री ११ वाजता आम्हाला संबंधित प्रकरणाची माहिती देण्यात आली ते म्हणाले की, “माझ्या वडीलांना गोळ्या घालून ठार मारले आहे. आम्हाला न्याय हवा आहे. त्यासाठी आम्ही काहीही करू", असे सांगण्यात आले. 
 
Powered By Sangraha 9.0