मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मालेगावमध्ये ‘व्होट जिहाद’साठी (Vote Jihad) बाहेरून ‘फंडिंग’ आले, असा गौप्यस्फोट माजी आ. आसिफ शेख यांनी शुक्रवार, दि. १४ मार्च रोजी केला. यासंदर्भातील पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत मालेगावचे विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती यांच्याकडून अवघ्या काही मतांनी असिफ शेख यांना पराभव स्वीकारावा लागला होता. एका मुस्लीम माजी आमदाराने ‘व्होट जिहाद’ झाल्याचे मान्य केल्यामुळे विरोधकांचा कुटील डाव उघड झाला आहे. यासंदर्भात आपल्याकडे सर्व प्रकारचे पुरावे उपलब्ध आहेत. गरज वाटल्यास तपास यंत्रणांना आपण हे पुरावे देण्याची तयारी ठेवली आहे, असे असा दावा माजी आ. शेख यांनी केला आहे.
विद्यमान आमदाराला मदत
या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहे. माझ्याकडे ‘व्होट जिहाद’संदर्भात असलेले पुरावे त्यांना सादर करणार आहे. मालेगावात निवडणुकीसाठी पैसा आला होता. बाहेरून आलेला हा पैसा विद्यमान आमदाराच्या मदतीसाठी होता, असा दावाही माजी आ. आसिफ शेख यांनी केला आहे.