पापाचा घडा भरला : हिंदू भजनात दंग असतानाच मुर्तींची विटंबना! ममता सरकार मूग गिळून गप्प! मंदिरात छिन्नविछिन्न अवस्थेत मुर्त्यांचे अवशेष...
14-Mar-2025
Total Views |
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला. हे मंदिर मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम ब्लॉक २ मधील कमलापूर गावातील आहे, या हल्ल्याची माहिती भाजप नेते अमित मालवीय यांनी शुक्रवारील १४ मार्च होळीच्या दिवशी सोशल मीडियावर दिली. त्याने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात हिंदू देवी-देवतांच्या मूर्तीची विटंबना केल्याचे दिसून आले आहे.
या घटनेबाबत मालवीय यांनी लिहिले की, नंदीग्राम ब्लॉक २ मधील अहमदाबाद परिसरात कमलपूरमधील लोक गेल्या मंगळवारपासून पूजा करत होते. पूजा आणि राम नारायण कीर्तन अखंडपणे सुरू असताना काही समाजकंटकांनी घटनास्थळी जाऊन तोडफोड केली आणि मूर्तीची विटंबना करण्यात आली.
व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती म्हणाला की, ही परिस्थिती अगदी गंभीर आहे. पोलिसही शांत आहेत...तुम्ही पाहू शकता की पोलीस काहीही करू शकत नाहीत. या व्हिडिओत एक पोलीस एका व्यक्तीला धमकावत असल्याचे दिसत आहे. हिंदू देवी-देवतांच्या अपवित्र आणि तोडफोड केलेल्या मूर्तींची विटंबना करण्यात आलेले व्हिडिओ समोर आले आहेत.
त्याच वर्षी म्हणजे २०२५ या वर्षात ७ मार्च रोजी, शेख इंदू नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीने शीतला देवीच्या मूर्तीची तोडफोड केली. त्यावेळी शेख इंदूला स्थानिकांनी पकडले आहे.
दरम्यान, बरुईपूर पोलिसांनी ७ मार्च रोजी एक ट्विट शेअर केले. ज्यात असा दावा करण्यात आला की, आरोपी हा विकृत असून त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. स्थानिक लोकांनी आरोपीला पकडले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असे पोस्टमध्ये म्हटले आहे.