रमजानच्या काळात मशिदीत झालेल्या स्फोटाने पाकिस्तान हादरले

14 Mar 2025 20:11:23

Blast in Pakistan Mosque during Ramzan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Blast in Pakistan Mosque)
पाकिस्तानमध्ये रमजानच्या काळात मशिदीत स्फोट झाल्याची माहिती आहे. दक्षिण वझिरीस्तान, खैबर पख्तुनख्वा येथे एका मशिदीत प्रार्थनेदरम्यान मोठा स्फोट झाला असून या हल्ल्यात जमियतच्या मौलानासह तीन जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १.४५ वाजता मौलाना अब्दुल अजीज मशिदीत स्फोट झाला.

हा आयइडी स्फोट असल्याचे स्पष्ट होत आहे. यात तीन जण जखमी झाले असून, त्यांना जिल्हा मुख्यालयात दाखल करण्यात आले आहे. मौलाना अब्दुल्ला नदीम हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दहशतवादाची आग भडकवणारा पाकिस्तान स्वतःच आपल्या जाळात अडकू लागला आहे. रमजानच्या काळातही दहशतवादी घटना घडत आहेत. रमजानपूर्वी खैबर पख्तुनख्वामधील हक्कानिया मशिदीत शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. दारुल उलूम हक्कानिया मशीद नौशेरा जिल्ह्यातील अकोरा खट्टक शहरात आहे.

Powered By Sangraha 9.0