रत्नागिरी : जिल्ह्यात होळीनिमित्त गुरूवारी १३ मार्च रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये काही हिंदू लोक हे मशिदीच्या गेटजवळ लाकडी ओंडका घेऊन जाताना दिसत होते. याबाबत मोहम्मद जुबैर असदुद्दीन ओवैसी आणि काही इस्लामिक कट्टरवादी संघटनांनी दावा केला की, हिदूंनी मशिदीवर हल्ला केला. हे सर्व होळी सणाच्या दिवशीच घडले.
हा व्हिडिओ शेअर करताना AltNews च्या मोहम्मद जुबैर यांनी लिहिले की, हा एक लज्जास्पद व्हिडिओ रत्नागिरीच्या राजापूरमधून समोर आला आहे. ज्यात होळी दिवशी लोक एक लाकडाचा ओंडका घेऊन मशिदीच्या दरवाजावर पोहोचले आणि ते गेटमध्ये ३-४ फूट आत घुसण्याचा प्रयत्न केला, तेही दोनदा काही लोकांनी आणि पोलिसांनी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी असाही खोटा दावा केला की, अनेक माध्यमांनी अशा अनेक गोष्टींना दुर्लक्षित केले आहे.
झुबैरच्या पोस्टनंतर मकतूब मीडियाने हा व्हि़डिओ शेअर केला. मकतूब मीडियाने अनेकदा हिंदूंना लक्ष्य केले आहे. याप्रकरणानंतर आता असिदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, कायदा हा स्वत:चा मार्ग स्वीकारेल का? पोलिसांसमोर मशिदीवर हल्ला होणे हे लज्जास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदूंच्या जमावाने मशिदीवा लक्ष्य केले आहे आणि हा मुस्लिमांवरील अन्यायाबाबतचा एक पुरावा करण्यात येत आहे.
संबंधित प्रकरणावर रत्नागिरी पोलिसांनी या सर्व गोष्टींना स्पष्टपणे नकार दिला आहे. सोशल मडियावर म्हटल्याप्रमाणे, मशिदीत प्रवेश करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या व्यक्तीने संबंधित पोस्ट सोशल मीडियावर शेअऱ केली त्याला ही पोस्ट हटवण्यास सांगितली. हे लोक अजूनही चुकीच्या गोष्टी पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांनी हे कोकणातील शिमगा सणाची जुणी परंपरा आहे. त्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी ७.३० वाजता जवाहर चौकात ही घटना घडली. शिमगा सणानिमित्त निघालेल्या एका मिरणवणुकीत मीरावणुक नावाचा विधी केला जातो. ही मिरवणूक साखळकरवाडीमधून सुरू होते आणि २ किमी अंतरावर असलेल्या धोपेश्वर मंदिरापर्यंत जाते. वाटेत मशिदीच्या पायऱ्यांवर काही काळांसाठी एक लाकडाचा ओंडका ठेवला जातो. पोलिसांनी सांगितली की, कोकणातील परंपरा वेगवेगळ्या आहेत.
यावेळी, एसपी धनंजय कुलकर्णी म्हणाले की, या विधीत मिरवणूक मशिदीच्या पायऱ्यांवर थांबते आणि लाकडाला मशिदीच्या दाराला स्पर्श केला जातो. मुस्लिम लोक नारळ अर्पण करत त्याचे स्वागतही करतात. मात्र, नेमका त्याच दिवशी गोंधळ निर्माण झाला, अशावेळी रत्नागिरी पोलिसांनी कलम १३५ कलमांतर्गत एफआरआय दाखल केला आणि तपास सुरू करण्यात आला असून सध्या घटनास्थळी शांतता असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे एका प्रसारमाध्यमाने सांगितले की, मुस्लिमही या परंपरेत सहभागी होतात. एका स्थानिक मुस्लिम व्यक्तीने सांगितले की, ही मिरवणूक दर पाच वर्षांनी होळी सणानिमित्त निघते आणि मशिदीच्या पायऱ्यांवर येऊन थांबते. असाच प्रकरणारे यंदाची मशिदीच्या गेटवर एक लाकू़ड ठेवण्यात आले. याप्रकरणी आता पोलिसांनी कोणताही हल्ला झाला नसल्याचे सांगितले. तो फक्त एक विधी होता. व्हिडिओचा वापर हा चुकीच्या उद्देशासाठी वापरण्यात आला. मात्र, यामागील सत्य समोर आलेले आहे.