नवी दिल्ली (Hanif arrested): दिल्लीमध्ये (Delhi) २०१९ साली नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान दक्षिण – पूर्व दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये झालेल्या हिंसाचारातील एका आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मोहम्मद हनीफ हा शाहीन बागचा रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये हनीफविरुद्ध नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु तो फरार होता. त्यानंतर शुक्रवारी गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी गाजीपूर-घडोली गाव रस्त्याजवळ सापळा रचून हनिफला अटक केली.
डिसेंबर २०१९ मध्ये न्यू फ्रेंड्स कॉलनी परिसरात झालेल्या हिंसाचारात हनीफ आणि त्याचा भाऊ हारून सहभागी झाले होते. त्यांच्याविरुद्ध दंगल, बेकायदेशीर जमवाजमव आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता, हनीफला यापूर्वी जामीन मिळाला होता. मात्र, तो न्यायालयात हजर राहिला नाही, त्यानंतर त्याला फरार गुन्हेगार घोषित करण्यात आले होते; अशी माहिती असे पोलिस उपायुक्त (विशेष पथक) अमित कौशिक यांनी सांगितले आहे.