मुंबई: ( Tributes to the late Yashwantrao Chavan on his birth anniversary ) आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी मंत्री महोदय व दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) डॉ.विलास आठवले आणि विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.