मुंबई : बॉलिवूडमध्ये एक ऐतिहासिक छावा सिनेमाने संबंध भारताच्या मानावर राज्य करत आहे. छत्रपती संभाजी माहाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा देशाप्रती आणि आपल्या धर्माप्रती असलेला आदर आणि प्राणांचे दिलेले बलिदान यावर भाष्य करणारा इतिहास आहे. इतिहासात औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांप्रती असलेली क्रूर वागणूक आणि लपवण्यात आलेला इतिहास हा चित्रपटाच्या माध्यमातून समोर आला. याचपार्श्वभूमीवर औरंगजेबाला प्रेरणा माणणाऱ्यांना या सिनेमातून जबरदस्त चपराकर तर आहेच, त्यासोबत खरी माहिती जनतेसमोर आल्याने भारतातील जनता जागी झाली आहे. अशातच आता बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर यांचे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी औरंगजेबाची कबर तोडण्यापेक्षा त्याचा वापर शौचालयासाठी करा, अशी मागणी केली.
लेखक मुंताशीरने त्याच्या व्हिडिओमध्ये हिंदूविरोधी लोकांनाही लक्ष्य करण्यात आले असून ते म्हणाले की. ते म्हणतात की, भारत कोणाच्याही बापाचा नसल्याने काही समाजकंटक बोलताना दिसतात, पण मी त्यांना प्रांजळपणे सांगेन की, भारत हा आमच्या माय बापांचा होता आणि राहील.
त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओत म्हणाला की, औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय लज्जेचे स्मारक आहे. त्या ठिकाणी असे काय आहे ज्याचा कोणत्याही भारतीयाला अभिमान वाटावा...जर औरंगजेबाची कबर अभिमानास्पद असेल आपण आपल्या देशभक्तीचा विचार केला पाहिजे, असे लेखक मुंताशीर म्हणाला.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या संपूर्ण वादाला सपा नेते अबू आझमी यांच्या औरंग्यांचे कौतुक करणाऱ्या वक्तव्यानंतर सुरूवात झाली. या वक्तव्यानंतर आता मनोज मुंताशीरने प्रतिक्रिया दिली आहे. हे वाचल्यानंतर अनेक लोक त्याचा विरोध करत आहेत आणि अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत.