कल्याण परिसरात हिंदूंना लक्ष्य करण्याची पहिलीच वेळ नाही
11 Mar 2025 18:52:48
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Kachore Mini Pakistan) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्यवीर नगर, कल्याण पूर्व येथील कचोरे गावच्या बाल शाखेवर दगडफेक झाल्याने संपूर्ण परिसरात संतप्त वातावरण तयार झाले आहे. इस्लामिक विचारसरणी असलेल्या पाचही आरोपींना टिळक नगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. यापैकी चार आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे यातील सत्यता उलगडण्याकरीता आरोपींच्या वैद्यकीय तपासणीबाबत सध्या मागणी होतेय. इतकेच नव्हे तर, कचोरे भागातील धर्मांधांना याभागास मिनीपाकिस्तान करायचे असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय.
गंभीर बाब म्हणजे, कचोरे भागातील धर्मांधांनी असे कृत्य करायची ही पहिली वेळ नाही. मिळालेल्या माहितीनुसार हिंदूंचे सण आले की, दोन गटांत तणाव निर्माण करायचा प्रयत्न कचोरे भागातील धर्मांधांकडून केला जातो. हिंदूंनी आपला परिसर सोडून जावा, अशी त्यांची इच्छा आहे. वास्तविक दुर्गाडी किल्ला नजीक झालेल्या नवीन रस्त्याच्या बांधकामामुळे गोविंदवाडी परिसरातील अल्पसंख्याकांना २०१५ दरम्यान कचोरे भागात राहण्यास घरे दिली होती. तेव्हापासून या परिसरात त्यांची वस्ती वाढत गेली. हिंदूंचे सण आले की त्यास गालबोट लावण्याचा प्रयत्न धर्मांधांकडून होतो.
म्हणजेच मीरा-भाईंदर परिसरातील नयानगर किंवा रत्नागिरीतील कोकण नगर परिसराप्रमाणे कचोरे भाग देखील मिनिपाकिस्तान बनवून हिंदूंना किंवा संघ स्वयंसेवकांना लक्ष्य करण्याता धर्मांधांचा डाव असल्याचा असा संशय स्थानिकांकडून व्यक्त होतो आहे. मंगळवार, दि.११ मार्च रोजी दगडफेक करणाऱ्या आरोपींना कोर्टात हजर केले असता, त्यांना गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
४ नगरांचे सांघिक, २०० स्वयंसेवक सदंड उपस्थित
चौधरीवाड्यातील मोकळ्या मैदानात लागणाऱ्या संयुक्त शाखेवर झालेली दगडफेकीची घटना संतापजनकच होती. ज्या संघस्थानावर धर्मांधांनी दगडफेक केली, त्याच स्थानावर नंतर एकूण ४ नगरांचे सांघिक झाले. यावेळी एकूण २०० स्वयंसेवक सदंड उपस्थित होते. दरम्यान व्यायाम, दंड प्रहार, खेळ असे विविध शारीरिक कार्यक्रम घेण्यात आले.
भोंगे चालतात... घंटानाद का नाही?
गेल्या २०१५ पासून कचोरे भागात धर्मांधांचा उन्माद वाढला आहे. हिंदूंचे सण आले की, त्यास गालबोट लावायचा प्रयत्न धर्मांधांकडून होतो. गणपतीमध्ये विसर्जन मिरवणूक काढून देण्यास विरोध केला जातो, सोसायटीची पूजा असल्यास मोठ्या आवाजात आरती म्हणायची नाही, मंदिरात घंटानाद करायचा नाही, असे सांगून धमकवले जाते. जर तुम्हाला मशिदींवरचे भोंगे चालत असतील तर मंदिरातला घंटानाद का नाही? याचा अर्थ धर्मांधाना करोचे भाग मिनिपाकिस्तान करायचा आहे, हे निश्चित.