कल्याणमधील बाल शाखेवर धर्मांधांची दगडफेक

10 Mar 2025 15:59:46

Stone Pelting on RSS Shakha Dombivli

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Shakha Kalyan)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्यवीर नगर, कल्याण पूर्व येथील कचोरे गावच्या बाल शाखेवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. सीसीटिव्ही फुटेजनुसार सर्व पाच आरोपी इस्लामिक विचारसरणीचे असल्याचे स्पष्ट होत आहे. पाच पैकी तीन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. झालेल्या दगडफेकीत बाल स्वयंसेवकांना कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नसून सदर प्रकरणी सर्व आरोपींविरोधात टिळक नगर पोलीस स्थानक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तिघांना ताब्यात घेतले असून दोघांचा तपास सुरु आहे.

हे वाचलंत का? : भारताचा दणदणीत विजय कट्टरपंथींना झोंबला!

मिळालेल्या एफआयआर कॉपीनुसार, चौधरीवाड्यातील मोकळ्या मैदानात लागणाऱ्या या शाखेत दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत परिसरातील ८ ते १५ वयोगटातील लहान मुलांना मैदानी खेळ, राष्ट्रभक्ती, बाल संस्कारचे धडे दिले जातात. रविवार, दि. ९ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास बीएसयुपी बिल्डींग न्यु गोविंदवाडी इमारतीच्या आडून काही धर्मांधांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सिमेंट काँक्रिटचे दगड फेकण्यास सुरुवात केली. सदर प्रकरणाची टिळक नगर पोलिसांनी दखल घेतली असून आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम १२५ व कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Powered By Sangraha 9.0