मोठी बातमी! वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंड

01 Mar 2025 13:12:10
 
Walmik Karad Mastermind
 
मुंबई : बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट पुढे आली असून वाल्मिक कराड हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याची माहिती समोर आली आहे. सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी सीआयडीने १८०० पानांचे आरोपपत्र सादर केले. सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे नमूद केले आहे. तसेच इतर आरोपींबद्दलची माहितीदेखील या आरोपपत्रात मांडण्यात आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली, तसेच त्यांच्या हत्येच्या वेळी काढण्यात आलेला व्हिडीओदेखील सीआयडीने सादर केला आहे. संतोष देशमुख खंडणी देण्यास विरोध करत असल्याने त्यांची हत्या केल्याचे आरोपपत्रातून स्पष्ट झाले आहे.
 
हे वाचलंत का? -  स्वारगेट अत्याचार प्रकरणी महिला जागर समिती आक्रमक! हातात तिरडी घेत बसस्थानकात आंदोलन
 
दरम्यान, या आरोपपत्रात रणजीत मुळे आणि सिद्धार्थ सोनावणे या दोघांची नावे पुराव्याअभावी वगळण्यात आली आहेत. मात्र, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच सर्वांकडून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे.  
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0