काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर! कोणत्या पदावर कुणाची वर्णी?

01 Mar 2025 13:56:31
 
Congress
 
मुंबई : काँग्रेसकडून विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अनेक तरुण नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
 
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. यात विधानसभेच्या उपनेतेपदी अमीन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख तर सचिवपदी विश्वजीत कदम यांची वर्णी लागली आहे. तसेच शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राम यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  मोठी बातमी! वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंड
 
यासोबतच विधानपरिषद गटनेतेपदी सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विधानपरिषेच्या मुख्य प्रतोदपदी अभिजीत वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0