लाडकी बहिण योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार!

06 Feb 2025 11:57:06
 
Ladki Bahin Yojana
 
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रसिद्धीकरिता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या जाहीरात प्रसिद्धीकरिता सरकारकडून ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असून राज्यभरातील कोट्यवधी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. दरम्यान, आता ही योजना ग्रामीण भागासह राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी, यासाठी योजनेची जाहीरात प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या आराखड्याला तसेच त्यासाठी होणाऱ्या खर्चाकरिता ३ कोटी रुपयांची शासन मान्यता देण्यात आली आहे. यापैकी सोशल मीडियाकरिता १ कोटी ५० लाख रुपये आणि डिजीटल मीडियाकरिता १ कोटी ५० लाख अशी विभागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने यापूर्वी लाडकी बहिण योजनेसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद केली असून आता त्यातील ३ कोटी रुपये योजनेच्या माध्यम प्रसिद्धीकरिता खर्च करण्यात येणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0