ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी अवामी लीग पक्षाच्या समर्थकांना संबोधित केले . शेख हसीना यांनी केलेल्या संबोधनानंतर बांगलादेशातील ढाक्यातील असलेल्या आंदोलकांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या ऐतिहासिक निवासस्थानावर हल्ला केल्याची माहिती समोर आली. यावेळी आंदोलकांनी निवासस्थानाची तोडफोड करत हल्ला केल्याचे वृत्त आहे.
शेख हसीना यांनी आपल्या समाजमाध्यमावर लाईव्ह येत लोकांना संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सांगितले की, बांगलादेशात मला मारण्यासाठी ही चळवळ उभी केली होती. मोहम्मद युनूसने मला आणि माझ्या बहिणीला मारण्याची योजना आखली होती.
त्यानंतर त्या पुढे म्हणाल्या की, जर या हल्ल्यानंतरी मला अल्लाहने जिवंत ठेवले असेल तर मी नक्कीच काहीतरी मोठं काम केलं. जर हा प्रसंग घडला नसता तर मी इतक्या वेळा मृत्यूच्या दारातून परतली नसती.
त्यांनी आपल्या भाषणादरम्यान, प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यापैकी लोकांनी घर का पेटवले? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मी बांगलादेशच्या लोकांकडून न्यायाची मागणी करतो. मी माझ्या देशासाठी काही केले नाही का? आमचा अपमान का झाला? शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले होते. तेव्हा बांगलादेशी कट्टरपंथींनी त्यांच्या निवासस्थानाची तोडफोड करण्यास सांगितली होती. त्यांच्या घरात असलेल्या वस्तू लुटण्यात आल्या होत्या. तसेच त्यांच्या निवासस्थानावर बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आले.
दरम्यान,त्या पुढे म्हणाल्या की, हल्लोखोरांनी तोडफोड केलेल्या घराशी माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. घरे जाळता येतात, पण इतिहास पुसता येत नाही. त्यांनी मोहम्मद युनूस आणि त्यांच्या समर्थकांना आव्हान दिले की. ते बुलडोझरने संविधान आणि राष्ट्रध्वज नष्ट करतील. मात्र लाखो शहीदांच्या जीवांच्या किंमतीवर साध्य करण्यात आले होते. बुलडोझरने इतिहास पुसता येत नसल्याचे त्या म्हणाल्या.