मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात १४.१९ टक्क्यांनी वाढ! आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून अर्थसंकल्प सादर

04 Feb 2025 12:24:38
 
BMC
 
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत १४.१९ टक्क्यांची भरीव वाढ करण्यात आली आहे.
 
अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. वित्तीय शिस्त आणि शाश्वतता, पायाभूत सेवासुविधांचे सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था, स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरण, सामाजिक उपक्रम, प्रशासकीय आणि कार्यालयीन कार्यक्षमता इत्यादी उद्दिष्टांवर आधारित हा अर्थसंकल्प आहे.
 
हे वाचलंत का? -  नितीन राऊतांचा प्रदेशाध्यक्ष पदावर डोळा! नाना पटोलेंचा पत्ता कट होणार?
 
सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ६५ हजार १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ७४ हजार ४२७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून मागील वर्षाच्या तुलनेत १४.१९ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0