JNU विद्यापीठाचे प्राध्यापक राजीव सिजारिया लाचखोरी प्रकरणात निलंबित

04 Feb 2025 14:38:21
 
JNU
 
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) प्राध्यापक राजीव सिजारिया यांना लाचखोरी प्रकरणामध्ये निलंबित केले आहे. त्यांनी १.८ कोटी रुपयांची लाचखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. सिजारीया हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या अटल बिहारी वाजपेयी स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक असून त्यांच्यावर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना आता अटकही करण्यात आली आहे.
 
राजीव सिजारिया हा राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद अहवालाशी संबंधित प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नॅकचा अहवाल तयार करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
 
 
एका वृत्तानुसार, सिजारिया यांच्या निलंबनाच्या आदेशात असे लिहिण्यात आले आहे की, केएलईएफला अनुकूल A++ मान्यता मिळवून देण्याबाबत लाचखोरीचा आरोप करत भ्रष्टाचार प्रकरणात राजीव सिजारिया यांचा प्रथम सहभाग असल्याचे दृष्टीस आले. त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा त्यांनी गैरवापर केला. अधोरेखित केलेल्या व्यक्तीने सीबीआय चौकशी आणि संबंधित प्रकरणावर विभागीय चौकशीबाबत निकाल समोर येईपर्यंत सिजारियांना विद्यापीठाच्या सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांना निलंबन करण्याचा आदेश हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठांच्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0