जयपूर : इंगलंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक भारत दौऱ्यावर असून, सध्या ते सहकुटूंब विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत आहेत. अशातच राजस्थानमधील विख्यात जयपूर साहित्य महोत्सवात त्यांनी सहकुटुंब हजेरी लावली. सुनक यांच्या पत्नी अक्षाता मूर्ती आणि त्यांच्या मतोश्री सुधा मूर्ती यांनी एका कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला.
ऋषी सुनक यांच्या सहभागाबद्दलची एक चित्रफित सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये सुधा मूर्ती सुनक यांना लोकांना नमस्ते करण्यास सांगत असल्याचे दिसून येत आहे. त्याच बरोबर इन्फोसीसचे संस्थापक नारायण मूर्ती सुद्धा या महोत्सावत सामील झाले आहे. समाजमध्यमांवर याबद्दल सकारात्मक प्रतिक्रीया उमटल्याचे दिसून आले आहे. ऋषी सुनक आणि नारायण मूर्ती यांच्या सहभागामुळे कार्यक्रमात मोलाची भर पडेल असे मत काहींनी व्यक्त केले.
मुंबईत लूटला क्रिकेटचा आनंद!
रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी ऋषी सुनक मुंबईमध्ये आले. दक्षिण मुंबईच्या पारसी जिमखान्यात त्यांनी क्रिकेटचा आनंद लूटला. क्रिकेटशिवाय मुंबईचा कोणताही प्रवास पूर्ण होत नाही अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली. पारसी जिमखान्याच्या वर्धापनदिनानिमित्त सुनक कार्यक्रमात सहभागी झाले होते.