निवडणूकीच्या आधी धनंजय मुंडे आणि कराडने माझी भेट घेतली : मनोज जरांगे

03 Feb 2025 14:13:32
 
Manoj Jarange
 
जालना : निवडणूकीच्या आधी धनंजय मुंडे आणि कराडने माझी भेट घेतली होती असे वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केले आहे. सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
हे वाचलंत का? -  घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा एसआयटी अहवाल तात्काळ प्रसिद्ध करा! किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
 
मनोज जरांगे म्हणाले की, "विधानसभा निवडणूकीच्या आधी अंतरवाली सराटीमध्ये शेकडो मोठमोठे नेते येत होते. मी त्यांचा कायम सन्मान करून त्यांना भेटत होतो. धनंजय मुंडेंचेदेखील ८ दिवसांपासून मला भेटण्यासाठी फोन येत होते. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दोघेजण मला भेटायला आले. त्यावेळी धनंजय मुंडेंनी मला वाल्मिक कराडची ओळख करून दिली. निवडणूकीचा काळ असल्याने आमच्याकडे लक्ष ठेवा असे ते मला म्हणाले," असे जरांगेंनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0