झोपू योजनांना गती देण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले

28 Feb 2025 12:25:51

Vasai virar


मुंबई, दि.२८ : प्रतिनिधी 
मुंबई पाठोपाठ महानगरातील शहरे झोपडपट्टीमुक्त व्हावी तसेच झोपडप‌ट्ट्यांमधील रहिवाशांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावावा या उद्देशातून आता वसई-विरारमधील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने वसई-विरार परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वसई-विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी जनजागृती करण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आलेले आहे. वसई-विरार परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना धोरण,उद्दिष्ट, झोपडीधारकांना होणारा लाभ या सर्व बाबी जनसामान्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. झोपडीधारकांचा सकारात्मक सहभाग वाढविण्याकरिता व योजनेची माहिती झोपडीधारकारितप्राणे पोहचविल्यास झोपु योजना यशस्वी होण्यास मदत होईल. त्याअनुषंगाने वसई-विरार परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजनाबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण वसई-विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी जनजागृती करण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

ही कार्यशाळा वसई-विरार महानगरपालिका मुख्यालय, चौथा मजला सभागृह, विरार (पूर्व) येथे आज दि.२८ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रातील झोपडीधारक सामान्य नागरिकांना सविस्तर माहिती देऊन प्रक्रियेबाबत सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात आमदार विलास तरे, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी एसआरए ठाणे पराग सोमण आणि वसई-विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Powered By Sangraha 9.0