पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी ऊसाच्या शेतात? पोलिसांकडून शोध सुरु

27 Feb 2025 18:05:21
 
Pune Case
 
पुणे : पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरुर येथील गुनाट गावातील ऊसाच्या शेतात लपला असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, पोलिसांचे पथक गुनाट गावात दाखल झाले असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
 
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे अद्याप फरार आहे. तो बुधवारी रात्री गुनाट गावात आला असून ऊसाच्या शेतात लपून बसल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी १०० पोलिसांचा ताफा गुनाट गावात दाखल झाला आहे. ऊसाच्या शेतात जाऊन आरोपीचा शोध घेण्यात येणार आहे.
 
 हे वाचलंत का? - उबाठा गटाची गळती कायम! कोल्हापूर जिल्ह्यात माजी आमदाराने सोडली ठाकरेंची साथ
 
पुणे पोलिसांनी आरोपीला फरार घोषित केले असून आरोपीची माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. ड्रोनच्या साहाय्यानेदेखील आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यासाठी पोलिसांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून लवकरच त्याला ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
नेमके प्रकरण काय?
 
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. २६ वर्षीय पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली असता ही घटना घडली. दरम्यान, स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0