बीड हत्या प्रकरणात सीआयडी आरोपपत्र दाखल करणार! आरोपींचे धागेदोरे उघड होणार?

27 Feb 2025 12:47:05
 
Santosh Deshmukh Chargsheet
 
बीड : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, यात आरोपींचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन अशा तीन यंत्रणांकडून तपास सुरु आहे. दरम्यान, आता बीडच्या विशेष मकोका कोर्टात या हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. जवळपास दीड हजार पानांचे हे आरोपपत्र असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून या घटनेचा तपास सुरु असून या आरोपपत्रात हत्येच्या घटनेशी संबंधित अनेक बाबी पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  धक्कादायक! पुण्यात कॅब चालकाकडून महिलेचा विनयभंग! चालत्या गाडीतून उडी घेत पीडितेची पोलिस स्टेशनमध्ये धाव
 
या हत्या प्रकरणात मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे, या घटनेतील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. हा खटला चालवण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियूक्ती केली आहे. त्यानंतर आता कोर्टात या घटनेचे आरोपपत्र दाखल करण्यात येणार असून या आरोपपत्रात कोणत्या गोष्टी उघड होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0