राज्यात तत्काळ शक्ती कायदा लागू करा - रोहित पवार

26 Feb 2025 16:36:20

rohit pawar on pune crime case
 
पुणे : (Rohit Pawar on Pune Crime Case) पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्टवर निषेध व्यक्त करत या घटनेमुळे सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची टीका केली आहे. संबंधित घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत म्हणून राज्य सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
 
रोहित पवारांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
 
रोहित पवार यांनी यामध्ये म्हटले आहे की, पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास बसमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्देवी घटना समोर आली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते स्वारगेट बसस्थानक राज्यातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक असून समोरच पोलीस स्थानकही आहे. तरी एका सराईत गुन्हेगाराकडून बिनदिक्कत अत्याचार करण्यात आल्याने सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 
या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यांमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी करतानाच महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असणारा शक्ती कायदा राज्यात तात्काळ लागू करण्याबाबत राज्य सरकार आता तरी तत्काळ निर्णय होईल, अशी अपेक्षा देखील रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0