"आपली मुलं महागडया शाळेत शिकतात तिथंही हिंदी भाषा शिकवली जाते मग.....," राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध करणाऱ्या द्रमुकला अन्नामलाईंकडून चपराक

26 Feb 2025 15:20:21

राष्ट्रीय शिक्षण धोरण
 
चेन्नई : "आपलीही मुलं महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. तिथेही हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषेचे ज्ञान दिले जाते. याला आता अन्नामलाईंनी द्रमुकचे ढोंग आहे का?', असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुनावले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० वरून तामिळनाडूत मोठा वादंग निर्माण झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन यांनी या धोरणाविरूद्ध आवाज उठवला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे धोरण तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
 
कुड्डालोरमध्ये झालेल्या एका बैठकीत स्टॅलिन म्हणाले, केंद्र सरकारने १० हजार कोटी आर्थिक पाठबळ दिले असले तरीही राज्यात हे धोऱण लागू शकणार नाहीत. यामुळे आमचे राज्य हे २ हजार वर्षे मागे जाईल, असा दावा त्यांनी केला. यावर आता अन्नामलाई यांनी या प्रकरणात उडी घेत द्रमुकला ढोंगी म्हटले असून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
चेन्नई आणि आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी हिंदी नावांच्या फलकांवर काळे फासून द्रमुक कार्यकर्त्यांनी हिंदी भाषेविरूद्ध राग व्यक्त केला. सेंट थॉमस माउंट पोस्ट ऑफिस, बीएसएनएल कार्यालय आणि अनेक रेल्वे स्थानकांच्या बोर्डलरील नमूद करण्यात आलेली अक्षरं काढून टाकण्यात आली आहेत.
 
 
 
तामिळनाडू भाजप अध्यक्ष अन्नमलाई यांनी याला ढोंग म्हणत द्रमुक नेते त्यांच्या मुलांना अशा शाळांमध्ये दाखल करत आहेत की, जिथे तीन भाषा शिकवल्या जात आहेत. मात्र सरकारी शाळांमध्ये मुलांना त्यापासून वंचित ठेवले जाते. यावेळी त्यांनी स्टॅलिनला विचारले की, जर हिंदी ऐच्छिक असेल तर त्याबाबत एवढा गोंधळ का?
 
 
 
अन्नामलाई यांनी द्रमुकच्य दुटप्पीपणावर टीका केली आणि म्हणाले की, नेते आपल्या मुलांना महागड्या शाळांमध्ये शिक्षण देतात. ज्याठिकाणी हिंदी, इंग्रजी आणि तमिळसारख्या भाषेचे ज्ञान दिले जाते. परंतु सरकारी शाळांमध्ये ही संधी दिली जात नाही. भाषा फक्त श्रीमंतांसाठीच आहे का? असा प्रश्न अन्नामलाई यांनी उपस्थित केला. द्रमुकचे नेते अन्नादुराई यांनी त्रिभाषा धोरणाला पाठिंबा दिला होता, मग आता याला विरोध का होत आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
 
 
Powered By Sangraha 9.0