म्यानमारमध्ये सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये अडकलेल्या ७० भारतीयांची अखेर सुटका

24 Feb 2025 20:32:15
 
cyber crime
 
नैय्पिडॉ : म्यानमारमध्ये सायबर गुन्हेगारीच्या (cyber crime) टोळीत अडकलेल्यांमध्ये ७० भारतीय नागरिकांचा समावेश होता. म्यानमार आणि थायलंडच्या सुरक्षा दलांच्या मदतीने त्यांना वाचवण्यात आले. त्यानंतर त्यांना थायलंडला हलवण्यात आले आहे. आतापर्यंत १३३ हून अधिक भारतीयांना या सुविधांच्या माध्यमातून वाचवण्यात आले. म्यावडी प्रदेशात कार्यरत असलेल्यांमध्ये गुन्हेगारी छावणीचे अनेक संशयित आयोजक आहेत.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्यांपैकी सुमारे १५ जण गुजरात, २० जण राजस्थानचे, पाच आंध्र प्रदेशचे, दोन तेलंगणाचे आणि इतर पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि कर्नाटकचे आहेत. पीडितांपैकी पाच महिला असून त्या गुजरात आणि महाराष्ट्रातील असल्याचे वृत्त आहे.
 
म्यानमान सुरक्षा दलांनी केके पोर्क, म्यावाडी सुविधेवर छापा टाकला. यामुळे अडकलेल्यांची सुटका करण्यात आली. आग्नेय आशियात नोकरीचे आमिष दाखवून भारतीयांना अडकवण्यात आले. नुकत्याच झालेल्या या आठवड्यात चीन सरकारने म्यानमानरच्या सायबर गुन्ह्याच्या घोटाळ्यातून शेकडो चिनी नागरिकांनाही वाचवण्यात आले.
 
 
 
सुटका करण्यात आलेल्या भारतीयांना थायलंडच्या हद्दीत असलेल्या सीमावर्ती मे सोट शहरात हलवण्यात आले. या ठिकाणाहूनच भारतीय दूतावासाचे कर्मचारी आणि थायलंडच्या अधिकाऱ्यांनी या अडकलेल्या लोकांना मायदेशी परत आणण्यासाठी समन्वय साधला जातो. दरम्यान, भारतीय अधिकारी संबंधित परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
 
म्यानमारच्या यादवी युद्ध आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा हा बोजावारा सुरू असताना, घोटाळेबाजपणा आणि नोकरीच्या नावाखाली पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. त्यातून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे सिंडिकेट चालवण्यासाठी सायबर गुन्हे समोर आणण्यासाठी धाडसी पाऊलं उचलली जात आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0