रत्नागिरी : (Chiplun and Sangameshwar) कोकणातील चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शुक्रवार दि. २२ फेब्रुवारीला सावर्डेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दोन्ही तालुक्यातील तब्बल आठ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची माहिती आहे. यावेळी आमदार शेखर निकम देखील उपस्थित होते.
आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले आहे. यावेळी चिपळूण आणि संगमेश्वर या दोन्ही तालुक्यातील अनेक उबाठातील कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व आमदार शेखर निकम यांनी प्रवेशकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.