रमजान सुरू असताना दुपारी ४ वाजता सुट्टी द्या, कर्नाटक काँग्रेस नेत्याची मागणी

21 Feb 2025 20:49:56
 
रमजान ईद
 
बंगळुरू : कर्नाटक सरकारने रमजानची सुट्टी जाहीर करण्याच्या परिपत्रकानंतर, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने गरुवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना रमजान महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे कमाचे तास कमी करण्याची विनंती केली.
 
कर्नाटक काँग्रेस सरकारच्या समितीने रमजान ईद दरम्यान मुस्लिम सरकारी कर्मचाऱ्यांना संध्याकाळी कामाचे तास कमी करण्याची विनंती केली. कर्नाटक सरकारच्या नवीन निर्देशासारखी धोरणे आणावी, ज्यामुळे अहिंदू कर्मचाऱ्यांना सायंकाळच्या सुमारास दोन तासांची रजा देण्याची तरतूद असावी अशी मागणी करण्यात आली.
 
दरम्यान, कर्नाटक सरकारच्या निर्देशानुसार, मुस्लिम सरकारी कर्मचाऱ्यांना रमजान दरम्यान नमाज अदा करत असताना दुपारी ४ वाजताच्या दरम्यान कामावरून सुट्टी घेण्याचा अधिकार आहे. कर्नाटक राज्य सरकारने पुढे म्हटले की, २ मार्च ते ३१ मार्च यादरम्यान रमजान महिन्याभरासाठी वैध राहणार असल्याचे निर्देश दिले. मात्र, या निर्णयानंतर अनेक हिंदू संघटना आणि भाजप नेत्यांनी याचा निषेध केला आहे.
 
या प्रकरणामध्ये भाजपने या मागणीविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, ही सुट्टी अस्वीकार्य आहे. कारण आजही अनेक हिंदू लोक उपवास करतात आणि विविध परंपरेचे पालन करतात. हे काही योग्य नाही. यावर खुद्द मुस्लिम बांधवांनीही यासंबंधित मागणी केली नाही. आम्ही अशा प्रकारच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाशी सहमत नसल्याचे बोलण्यात आले. 
 
 
मात्र, कर्नाटक सरकाने रमजानदरम्यान दुपारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसऱ्या बाजूला आंध्र प्रदेश राज्यातही हाच निर्णय घेण्यात आला असल्याचे एका प्रसारमाध्यमाने सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0