नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवार, २१ फेब्रुवारी रोजी विदर्भ दौऱ्यावर असून यावेळी अनेक बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राज्यभरात आभार दौरा करत आहेत. दरम्यान, राज्यात सातत्याने शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरचीही चर्चा सुरु आहे. मागच्या काही दिवसांत कोकणातील उबाठा गटाच्या अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता विदर्भातही शिवसेना ऑपरेशन टायगर राबवणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी उबाठा गटाचे माजी जिल्हा प्रमुख राजू हरणे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यासोबतच काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटे हेदेखील शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
हे वाचलंत का? - सत्तेचा दुरुपयोग करून नेत्यांना अडकविणे लोकशाहीसाठी घातक! प्रविण दरेकरांनी घेतली एसआयटी पथकाची भेट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून नागपूरात मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. शुक्रवारी कन्हान येथील केमिकल कंपनी मैदानावर सायंकाळी ६. १५ वाजता उपमुख्यमंत्री शिंदेंची आभार सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेत कोणाचा पक्षप्रवेश होतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.