आंगणेवाडीच्या यात्रेकरूंसाठी आनंदवार्ता! २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान धावणार विशेष रेल्वे

20 Feb 2025 18:04:51
 
Konkan Railway
 
सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथे होणाऱ्या श्री भराडी देवीच्या यात्रेसाठी कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे सेवा देण्यात येणार आहे. दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ही यात्रा सुरु होणार असून २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान भाविकांसाठी विशेष रेल्वे धावणार आहे.
 
आंगणेवाडीच्या जत्रेसाठी विविध भागांतून भाविक दाखल होत असतात. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकण रेल्वेने एक मोठा दिलासा दिला आहे. गाडी क्रमांक ०११२९ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड अशी धावणार आहे. दिनांक, २१ फेब्रुवारी रोजी रात्री १२.५५ वाजता ही गाडी एलटीटीवरून सुटेल आणि दुपारी १२ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तसेच २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गाडी क्रमांक ०११३० सावंतवाडी रोडवरून सुटेल. तर २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.१० वाजता ती एलटीटीला पोहोचेल.
 
हे वाचलंत का? -  मंत्री धनंजय मुंडेंना Bell's palsy आजार! म्हणाले, मला सलग दोन मिनिटेही...
 
गाडी क्रमांक ०११३१ २२ फेब्रुवारी रोजी रात्री १२.५५ वाजता एलटीटीवरून सुटेल आणि दुपारी १२ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. याच दिवशी सावंतवाडी रोड इथून सायंकाळी ६ वाजता गाडी क्रमांक ०११३२ सुटेल आणि २३ फेब्रुवारीला सकाळी ६.१० वाजता ती एलटीटीला पोहोचेल.
 
 
 
Powered By Sangraha 9.0